
मुंबई-गोवा महामार्गावरील खेड भरणे नाका पुलावर ऍसिड कंटेनर कोसळला, वाहतूक विस्कळीत.
मुंबई-गोवा महामार्गावरील खेड भरणे नाका येथील पुलावर ऍसिड वाहतूक करणारा कंटेनर अचानक रस्त्यावर उलटला. कंटेनरमधून ऍसिड रस्त्यावर पडल्यामुळे वाहने घसरू लागली होती. मात्र खेड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेवून तातडीने ऍसिड साफ करण्यात आले आणि मार्ग वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात आला. घटनेनंतर काही वेळेसाठी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. रस्त्यावर वाहणार्या ऍसिडमुळे अनेक वाहने घसरत होती. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.www.konkantoday.com