
मिर्या येथे आता मरीन लाईन्सच्या धर्तीवर ४० फूट आत समुद्रात बंधारा होणार, पालकमंत्री उदय सामंत यांनी केली पाहणी.
.
मिर्या धुपप्रतिबंधक बंधार्याचे सुमारे १२०० मीटरच्या टप्प्याचे काम गतीने सुरू झाले आहे परंतु हा बंधारा स्थानिकांच्या सात बारा उतारावर येत असल्याच्या तक्रारी होत्या. याचा विचार करून पालकमंत्री उदय सामंत यांनी त्यावर तोडगा म्हणून हा बंधारा ४० फूट आत समुद्रात बांधण्यात येत असून त्यावर रस्ता होणार आहे. त्यामुळे आलाव्यापासून ते अगदी पांढरा समुद्रापर्यंत स्थानिकांना समुद्राच्या उधाणापासून होणारा धोका कमी झाला असून, किनार्याचे संरक्षण झाले आहे. सुमारे १६० कोटीचे हे काम आहे तर बसरा स्टार जहज किनार्यावर आदळल्यामुळे ३०० मीटरच्या बंधार्याचे काम खोळंबले आहे.
दरवर्षी पावसाळ्यात मिर्या धूपप्रतिबंधक बंधार्याचा प्रश्न ऐरणीवर येतो. उधाणाच्या भरतीमुळे वारंवार बंधार्यांची चाळण होते. अजस्त्र लाटा बंधारा गिळंकृत करून मानवी वस्तीमध्ये समुद्राचे पाणी शिरते. यामुळे नागरिक भयभित होवून पावसाळ्यात त्यानंा रात्र जागून काढावी लागते परंतु आता सुमारे साडे तीन किमीच्या या धूपप्रतिबंधक बंधार्याच काम वेगाने सुरू झाले आहे. तीन वर्षामध्ये एकूण ३ हजार १५० मीटरच्या कामांपैकी १ हजार ९५० मीटर काम झाले आहे. जयहिंद चौक ते पांढरा समुद्र असा १२०० मीटरचा टप्पा राहिला होता. त्याचे काम देखील सुरू झाले आहे. मुळात समुद्राचे एवढे अतिक्रमण झाले आहे की सात ारावर तो आला आहे.
अनेकांच्या माडांच्या बागा, संरक्षक भिंती समुद्राने गिळंकृत केल्या आहेत. त्यामुळे हा धूपप्रतिबंधक बंधारा समुद्रातूनच व्हावा अशी स्थानिक ग्रामस्थांची मागणी होती. त्याबाबत त्यांनी आपली कैफियत पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे मांडली होती.पालकमंत्री उदय सामंत यांनी याचा विचार करून ठेकेदारांशी चर्चा करून मरिन ड्राईव्ह प्रमाणे हा बंधारा बांधण्याचा आराखडा तयार केला. या बंधार्यामुळे संपूर्ण मिर्यावासियांचे संरक्षण होईल आणि पर्यटन वाढीला मदत होईल असा त्यांचा उद्देश होता.www.konkantoday.com