पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर.

महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी आणि पालकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने (MSCE) 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे अंतरिम निकाल जाहीर केले आहेत.याबाबतची माहिती परीक्षा परिषदेच्या आयु्क्त अनुराधा ओक यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.ही परीक्षा 9 फेब्रुवारी 2025 रोजी घेण्यात आली होती. या परिक्षेसाठी पाचवीचे 5 लाख 46 हजार 874 विद्यार्थी तर आठवीचे 3 लाख 65 हजार 855 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. आता या परिक्षेचा अंतरिम निकाल जाहीर करण्यात आला आहे.

विद्यार्थी त्यांचे स्कोअरकार्ड अधिकृत वेबसाइट mscepune.in वरून डाउनलोड करू शकतातविद्यार्थी त्यांच्या शाळांमधूनही निकाल तपासू शकतात, कारण शाळांना देखील ऑनलाइन लॉगिनद्वारे निकाल पाहण्याची सुविधा देण्यात आली आहे.

विद्यार्थांसाठी महत्वाच्या सुचना-

विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करुन घ्यावयाची असल्यास आपल्या शाळेच्या लॉगीनमध्ये 25 मार्च 2025 ते 4 मे 2025 पर्यंत या कालावधीत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरीता रु. 50/- याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे भरणे आवश्यक आहे.

-विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, इत्यादीमध्ये काही दुरूस्ती असल्यास ते दि. 4 मे 2025 पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्जामध्ये नमुद करावी.-सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पध्दतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत.

विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. तसेच शाळा माहिती प्रपत्रात शाळेचे क्षेत्र (शहरी ग्रामीण) व अभ्यासक्रमात दुरूस्ती करावयाची असल्यास शाळा मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीचे विनंती पत्र पूर्ण माहिती नमूद करून सदरचे पत्र puppsshelpdesk@gmail.com या ईमेलवर 4 मे 2025 रोजीपर्यंत पाठविण्यात यावे, असं सांगण्यात आलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button