
पाकव्याप्त काश्मीर (पीओके) च्या पंतप्रधानांचे भारताविरुद्ध एक भडकाऊ विधान , या हल्ल्याचे समर्थन.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम याठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध आणखी बिघडले आहेत. आता पाकिस्तानकडून वादग्रस्त विधाने दिली जात आहेत.पाकव्याप्त काश्मीर (पीओके) च्या पंतप्रधानांनीही भारताविरुद्ध एक भडकाऊ विधान केले आहे. त्यांनी या हल्ल्याचे समर्थन करून हा हल्ला बलुचिस्तानात घडलेल्या घटनांचा बदला असल्याचे म्हटले आहे.पाकव्याप्त काश्मीर (पीओके) चे पंतप्रधान चौधरी अन्वरुल हक यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल धमकीवजा बोलताना, “मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की रक्त सांडावे लागले तरी आम्ही मागे हटणार नाही.
जर तुम्ही बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी लोकांचे रक्त सांडले तर तुम्हाला त्याची किंमत दिल्लीपासून काश्मीरपर्यंत चुकवावी लागेल.”असे म्हटले आहे. ते पुढे म्हणाले,”पीओकेचे सैनिक भूतकाळात अशा हल्ल्यांमध्ये सहभागी झाले आहेत आणि भविष्यात अधिक जोमाने सहभागी होतील. तुम्हाला जे करायचे आहे ते करा, आम्ही मागे हटणार नाही.”असे म्हणत त्यांनी भारताला धमकी दिली आहे.