तात्पुरत्या कालावधीकरिता अत्यावश्यक संच व गृहपयोगी संच वाटप बंद – सहायक कामगार आयुक्त.

रत्नागिरी, दि. 25 : तात्पुरत्या कालावधीकरिता अत्यावश्यक संच व गृहपयोगी संच वाटप बंद राहील यांची नोंद घ्यावी, असे आवाहन सहायक कामगार आयुक्तांनी केले आहे.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत जिवित नोंदीत बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच व गृहपयोगी संच दि. 24 एप्रिल रोजी पासून रत्नागिरी, चिपळूण व राजापूर तालुक्यामध्ये वाटप सुरु करण्यात आले होते.

अत्यावश्यक संच व गृहपयोगी संच वाटप होत असताना प्रचंड स्वरुपात गर्दी व गोंधळ होत आहे तसेच अतिशय कडक उन्हाळयाचे दिवस असल्याने कामगारांना या गर्दी गोंधळाचा त्रास होवू नये याबाबत योग्य ती खबरदारी व नियोजन करण्यात येवून तालुका निहाय अत्यावश्यक संच व गृहपयोगी संच वाटप करणेबाबत कार्यक्रम जाहीर करण्यात येईल. त्यामुळे तात्पुरत्या कालावधीकरिता अत्यावश्यक संच व गृहपयोगी संच वाटप बंद राहील यांची नोंद घ्यावी.000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button