
ज्येष्ठ नेते व खासदार शरद पवार यांची वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राला भेट.
राष्ट्रवादी काँग्रेस( एसपी) पक्षाचे नेते खा. शरद पवार हे 24 व 25 एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या खासगी दौर्यावर आहेत.दरम्यान गुरुवारी दुपारी त्यांनी वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राला भेट दिली.यावेळी त्यांनी शास्त्रज्ञांशी चर्चा केली व अधिक संशोधन व्हावे यादृष्टीने मार्गदर्शन केले.या भेटीदरम्यान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी विद्यापीठाच्या मागील 52 वर्षाच्या प्रगतीचा अहवाल ना. शरद पवार यांच्यासमोर सादर केला. यामध्ये विद्यापीठाने शिक्षण संशोधन व विस्तार क्षेत्रामध्ये केलेल्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.
श्री. पवार यांनी विद्यापीठाच्या कार्याचे तसेच विविध प्रकारच्या संशोधनाचे कौतुक केले व मार्गदर्शन केले. काजू पिकाच्या पुढील संशोधनाच्या दृष्टीने मार्गदर्शन केले.जास्त उत्पन्न देणार्या काजू ठेंगू जातीबाबत संशोधन व्हावे , असे सुचविले.यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. पी. सी. हळदवणेकर, संशोधन उपसंचालक (बियाणे), डॉ. ए. व्ही. माने, बँक संचालक व्हीक्टर डान्टस, प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. महेंद्र गवाणकर, बॅरिस्टर नाथ पै फाउंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंटच्या आदिती पै, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, श्री. रेगे, उद्योजक अवधूत तिंबलो, राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष नम्रता कुबल, राष्ट्रीय काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, तालुकाध्यक्ष विधाता सावंत,आंबा काजू शास्त्रज्ञ मंचचे जयप्रकाश चमणकर, प्रभारी अधिकारी डॉ. ए.पी. चव्हाण, सहयोगी प्राध्यापक डॉ. वाय. आर. परुळेकर, डॉ . एम. पी. सणस, डॉ. व्ही.एन. शेटये आदी मान्यवर उपस्थित होते.विद्यापीठाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.