
चुकून सीमा ओलांडणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या एका जवानाला पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतले.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान बॉर्डरवर मोठी घटना घडली आहे. सीमा सुरक्षा दलाच्या एका जवानाला पाकिस्तानी सैन्याने बुधवारी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.पंजामधील फिरोजपूर जवळील आंतरराष्ट्रीय सीमेवर ही घटना घडली आहे. संबंधित जवान ड्युटी करत असताना चुकून सीमा ओलांडली. त्यानंतर पाकिस्तान सैन्याने लगेच त्यांना ताब्यात घेतले.बीएसएफचे कॉन्स्टेबल पी. के. सिंग यांना पाकिस्तानी सैन्यात पकडले आहे. सिंग हे बीएसएफच्या 182 बटालियनमध्ये सेवेत आहेत.
झिरो लाईनवरील गेट क्रमांक 208/1 जवळ ते नियमित ड्युटी करत होते. जवळच्या शेतकरी शेतात काम करत होते. तिथूनच जात असताना उन्ह खूप असल्याने ते एका झाडाखाली थांबले. मात्र, हे करत असताना त्यांच्याकडून चुकून सीमा ओलांडण्यात आली होती. त्याचवेळी पाकिस्ताने सैन्याने सिंग यांना ताब्यात घेतले.