
गुहागर तालुक्यातील कुंभवणे आरेगाव या मार्गावर वाहतूक बंद – प्रवाशांचे हाल
गुहागर तालुक्यातील कुंभवणे आरेगाव या मार्गावर गेले अनेक दिवस मो-यांचे काम सुरु असल्याने रा. प. गुहागर आगार एस. टी. महामंडळाची बस सेवा या मार्गावर विस्कळीत झाली आहे त्यामुळे स्थानिक नागरीकांना व विद्यार्थ्यांना एकतर पायपीट करावी लागते अथवा खाजगी वाहनाने प्रवास करावा लागतो यात वेळ व जास्त पैसा वाया जातो. या गावातील निकृष्ठ रस्त्यांसंदर्भात कॉग्रेसचे दिवंगत नेते शंकर गुरव यांनी त्यावेळी त्यांच्या काळात या गावातील रस्ते सरकारने त्वरित करावे अशी आग्रही मागणी केली होती.तरी कंत्राटदार, ठेकेदार यांनी हे काम त्वरित पूर्ण करावे तसेच खासदार निधीतून संपूर्ण रस्ताच दुरुस्त करावा अशी आग्रही मागणी समाजसेवक व जेष्ठ पत्रकार पराग कांबळे यांनी केली आहे