
खेडमध्ये एका वर्षात ९५ जणांनी मृत्यूला कवटाळले
आजारपण, घरातील आर्थिक अडचणी, अभ्यासाचा ताण या आणि अशा विविध समस्यांनी ग्रासलेल्या ९५ जणांनी २०२४ या वर्षात आत्महत्या करत स्वतःहून जीवन संपवले. आत्महत्या करणार्यांमध्ये ४३ तरूणांचा समावेश आहे. नैराश्येसह दारूच्या नशेत तरूणांनी गळफास लावल्याचे समोर आले आहे. २३ वृद्धांनी आजारपणासह अन्य कौटुंबिक कारणांना कंटाळून गळफास लावला.www.konkantoday.com