
चिपळूण तालुक्यातील खडपोली रामवाडी येथील वाशिष्ठी नदीच्या डोहात मुलाला वाचवताना आई, आत्यासह तिघांचा बुडून मृत्यू.
चिपळूण तालुक्यातील खडपोली रामवाडी येथे आज दुर्दैवी घटना घडली आहे येथील वाशिष्ठी नदीच्या डोहात मुलाला वाचवताना आई, आत्यासह तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज, (दि.२५) दुपारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे, तर खडपोली गाव शोकमय झाले आहे.खडपोली रामवाडी येथील लता शशिकांत कदम (३५), लक्ष्मण शशिकांत कदम ( ८ ), रेणुका धोंडीराम शिंदे (४५) तिघेही जन खडपोली रामवाडी येथील डोहात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी लक्ष्मण शशिकांत कदम हा पाण्यात खेळत होता.
काही वेळाने तो पाण्यात बुडत असल्याचे त्याची आई लता शशिकांत कदम हिने पाहिले आणि त्याला वाचविण्यासाठी तिने नदीत उडी मारली. मात्र तीही बुडत होती.त्यामुळे माय लेकरांना वाचवण्यासाठी मुलाची आत्या रेणुका धोंडीराम शिंदे यांनी पाण्यात उडी मारली आणि तिघांचाही डोहात बुडून मृत्यू झाला. ही घटना दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी ग्रामस्थांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो असफल ठरला.