
१ मे ते २० मे कालावधित रत्नागिरीत खो-खो, व्हॉलीबॉलचे तर, डेरवाणात जिम्नॅस्टिक खेळाचे प्रशिक्षण शिबिर.
रत्नागिरी, दि. २४ : छत्रपती शिवाजी स्टेडीयम, मारुती मंदिर येथे दि. १ मे ते २० मे कालावधित सायंकाळी ५ ते ७ या वेळेत खो-खो व व्हॉलीबॉल या खेळाचे तर, एस.व्ही.जी.टी. क्रीडा संकुल, डेरवण, चिपळूण येथे प्रशिक्षण शिबिर दि. १ मे ते २० मे २०२५ सकाळी ७ ते ९ वाजता आणि सायंकाळी ४.३० ते ६.३० वा. या वेळेत जिम्नॅस्टिक या खेळाचे प्रशिक्षण शिबिर घेण्यात येणार आहेत. तरी, या उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरासाठी जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे.
*मुलांच्या परीक्षा संपल्यात आता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये काय करायचे? मुलांना वेळ घालविण्याकरीता काय घ्यायचे ? असा विचार पालकांच्या मनात आला असेलच तर क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद, रत्नागिरी व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी विविध खेळांचे उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी, खेळाचे मूलभूत कौशल्य आत्मसात व्हावीत तसेच आजच्या या स्पर्धेच्या युगात आपले अस्तित्व निर्माण करण्याकरिता येणाऱ्या प्रत्येक संकटाना जिद्दीने लढा देता यावा या उद्देशाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी तर्फे जिल्ह्यातील विविध शाळा, संघटना व संस्थेच्या माध्यमातून विविध खेळाचे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबिरामध्ये खो-खो, जिम्नॅस्टीक, व्हॉलीबॉल या खेळांचा समावेश आहे. सदर प्रशिक्षण हे अनिवासी तसेच निशुल्क आहे.
खो खो खेळासाठी ऐश्वर्या सावंत – ८९७५०६९६२३, व्हॉलीबॉलसाठी गणेश खैरमोडे – ९२८४३४२२१० आणि जिम्नॅस्टिकसाठी सचिन मांडवकर – ८४०८८६५८७० यांच्याशी संपर्क साधावा.000