
शरम वाटली पाहिजे तुला…. हा देशावरचा हल्ला आहे. कुठेतरी ओकायचं थांब…?? वेळ प्रसंग बघून तरी ओकत जा-शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांची संजय राऊत यांच्यावर टीका
. जम्मू काश्मीरमधील पहलगाममधील दहशतवादी हल्ला हा भाजपच्या द्वेषाच्या राजकारणाचे फलीत असून या हल्ल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेच जबाबदार आहेत, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता.त्यांच्या या टीकेला शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी प्रतित्युत्तर दिलं आहे. अरे गांजावाल्या… तुला थोडी लाज वाटते का? अशा शब्दात नरेश म्हस्के यांनी संजय राऊतांचा समाचार घेतला आहे.दहशतवादी हल्ला आपल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांवर झालाय. त्या भ्याड दहशतवाद्यांनी निरागस, निष्पाप लोकांना वेठीस धरले. धर्म विचारुन गोळ्या घातल्यात रे, तू त्याच्यावर राजकारण करतोस???? शरम वाटली पाहिजे तुला…. हा देशावरचा हल्ला आहे.
कुठेतरी ओकायचं थांब…?? वेळ प्रसंग बघून तरी ओकत जा. तुझ्या ओकाऱ्यांनी सुरक्षा यंत्रणा सरकार यांना काही फरक पडणार नाही… ते त्यांचं कर्तव्य परमनिष्ठेने करतात, करतील… आणि तुझ्याकडून सल्ला घेण्या इतकी वाईट वेळ त्यांच्यावर आलेली नाही.कोविड सारख्या जागतिक संकटातही स्वतःच्या तुंबड्या भरणारे तुमच्यासारखे लांडगे केंद्रात बसलेले नाहीत… तू तुझे भोंगे तुझ्या डबक्यात वाजवत राहा… राष्ट्रीय सुरक्षा वगैरे तुझ्या आवाक्यातले विषय नाहीत अशी टीका नरेश म्हस्के यांनी संजय राऊतांवर केली.