
भारताच्या निर्णयांनंतर आता पाकिस्ताननेही भारताविरोधात काही महत्त्वाचे निर्णय घेतले.
भारताने पाकिस्तावर वेगवेगळ्या पाच मार्गाने प्रहार केला आहे. भारताच्या या निर्णयानंतर आता पाकिस्तानचा जळफळाट झाला आहे. भारताच्या निर्णयांनंतर आता पाकिस्ताननेही भारताविरोधात काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.भारताने 23 एप्रिल रोजी घेतलेल्या निर्णयांतर पाकिस्तानमध्ये आज त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक पार पडली. या बैठकीत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली.
याच बैठकीनंतर आता पाकिस्तानने भारताला प्रत्युत्तर म्हणून काही निर्णय घेतले आहेत. पाकिस्तानने भाराताला लागून असलेली अटारी बॉर्डर बंद केलेली आहे. पाकिस्तानने भारतासोबतच्या व्यापारावर बंदी घातली आहे. पाकिस्तानने तेथे असलेल्या भारताच्या राजदुतांनी 30 एप्रिलपर्यंत भारतात परतावं अशा सूचना दिल्या आहेत. पाकिस्तानने त्यांचे हवाईक्षेत्र भारतासाठी बंद केले आहे. त्यामुळे आता भारताच्या विमानांना पाकिस्ताच्या हद्दीतून जाता येणार नाही.