पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचाच सहभाग असल्याचे पुरावे समोर आले.

भारतातील दहशतवादी हल्ल्यांमागे पाकिस्तानचा हात असल्याचे वेळोवेळी उघड झालेले आहे. मात्र, पहलगाम हल्ल्याबाबत पाकिस्तानने कानावर हात ठेवले आहेत. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी, पहलगाम हल्ल्याशी पाकिस्तानचा काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे. मात्र, आता या हल्ल्यात पाकिस्तानचाच सहभाग असल्याचे पुरावे समोर आले आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIA ने पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर चौकशीस सुरुवात केली आहे.

सुरुवातीच्या तपासात NIA ला या हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे मिळाले आहेत. बैसरन खोऱ्यात सुरक्षा यंत्रणांना वापरलेली 50 ते 70 काडतुसे मिळाली. ही काडतुसे अमेरिकन बनाटीच्या M4 कार्बाइन असॉल्ट रायफल आणि एके-47 मधील असल्याचे समोर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, M4 कार्बाइन पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानातील तालिबान्यांकडून हस्तगत केले आहे. तसेच या हल्ल्यात भारतीय लष्कराच्या गणवेशात दोन परदेशींसह चार दहशतवाद्यांचा समावेश होता. याशिवाय दोघे स्थानिक होते जे बैसरनच्या मैदानी भागात हजर होते आणि दहशतवाद्यांना मदत करत होते.पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचे पाकिस्तान कनेक्शन आता समोर आले आहे. सुरुवातीच्या तपासात दोन दहशतवाद्यांकडे M4 कार्बाइन असॉल्ट रायफल असल्याचे समोर आले आहे. तर अन्य दोघांकडे एके-47 रायफल होती. दहशतवाद्यांनी त्या खोऱ्यात आलेल्या पर्यटकांचा धर्म विचारत त्यांना गोळ्या घातल्या.

M4 कार्बाइन असॉल्ट रायफल अमेरिकेत तयार होते. माहितीनुसार, ऑगस्ट 2021 मध्ये अमेरिकेने अफगाणिस्तानातून आपल्या सैनिकांना परत बोलावले. मात्र, हत्यारे तिथेच सोडली होती. तालिबानने अमेरिकेची ही हत्यारे ताब्यात घेतली आणि ती आता दहशतवादी संघटनांना विकली जात आहेत. मात्र, यामुळे या हल्ल्यातील पाकिस्तानचा सहभाग समोर येत आहे.तसेच घटनास्थळी एके-47 च्या गोळ्या सापडल्या आहेत, त्या मेड इन चायना आहेत. चीनमध्ये तयार झालेल्या या गोळ्या बुलेट प्रूफ जॅकेटला भेदू शकतात. या गोळ्या स्टील बुलेट म्हणून ओळखल्या जातात. पाकिस्तान चीनकडून मोठ्या प्रमाणात हत्यारे आणि गोळ्या खरेदी करतो. त्यामुळेच, चीनमध्ये तयार होणाऱ्या या गोळ्या पाकिस्तान दहशतवाद्यांना पुरवत असल्याचा संशय आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button