
चिपळूणात तरुणी विरुद्धॲट्रॉसिटी व सावकारी प्रकरणी गुन्हा दाखल
व्याजी घेतलेले कर्ज फेडल्यानंतर तारण म्हणून ठेवलेली कागदपत्रे सावकारी करणाऱ्या तरुणीकडे मागण्याचा प्रयत्न केला असता सावकारी करणाऱ्या तरुणीने या महिलेशी वाद घालत जातीवाचक शिवीगाळ केली.या प्रकरणी तरुणी विरोधात ॲट्रॉसिटी व सावकारी प्रकरणी येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.राधा लवेकर असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबतची फिर्याद चिपळूणमधील एका महिलेने दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेने कौटुंबिक अडचणीपोटी राधा लवेकर हिच्याकडून काही महिन्यांपूर्वी २० हजार रुपये घेतले होते. या कर्जापोटी राधा लवेकर या तरुणीने कर्जदार महिलेकडून तारण म्हणून आधारकार्ड, रेशन कार्ड, पॅनकार्ड, बॉण्ड पेपर अशी कागदपत्रे घेतली होती. काही महिन्यानंतर कर्जदार महिलेने २० हजार रुपये कर्जापोटी राधा लवेकर हिला ४३ हजार रुपये अदा केले. कर्ज फेड झालेअसल्याने तारण ठेवलेली कागदपत्रे राधा लवेकर हीच्याकडे मागण्याचा त्या महिलेने प्रयत्न केला असता राधा हिने या महिलेशी वाद घालत जातीवाचक शिवीगाळ केली. ही घटना २५ रोजी घडली.या महिलेने येथील पोलीस ठाण्यात सावकारी व ॲट्रॉसिटी प्रकरणी तक्रार दिली. यानंतर राधा लवेकर हिच्याकडे सावकारी करण्याचा कोणताही परवाना आढळून आलेला नाही. यामुळे तिच्याविरोधात सावकारी व ॲट्रॉसिटी अंतर्गत येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे