
लोटे औद्योगिक क्षेत्रातील एम.आय.आर.सी. इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या गोडाऊनमधून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ४ लाख ६० हजार रुपयांचा माल चोरून नेला.
लोटे औद्योगिक क्षेत्रातील एम.आय.आर.सी. इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या गोडाऊनमधून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ४ लाख ६० हजार रुपयांचा माल चोरून नेला. ही घटना १ मार्च ते ११ एप्रिल २०२५ दरम्यान घडली. चोरी करताना चोरट्यांनी गोडाऊनच्या खिडक्या व दरवाजे तोडले, तसेच गोडाऊनमधील पीसीबी प्रिंटिंग मशिन, पीसीबी असेम्बलिंग मशिन आणि सर्किट बोर्ड प्रिंटिंग मशिनचे सुमारे २५ लाख रुपयांचे मोठे नुकसान केले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या चोरीप्रकरणी कंपनीचे प्रशासन अधिकारी जॉन लुईस डिसुजा (वय ६५, रा. मुंबई) यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, चोरट्यांनी गोडाऊनमधून २ लाख रुपये किंमतीची तांब्याची वायर, ५० हजार रुपये किंमतीचे इलेक्ट्रिकल पॅनल बोर्डमधील ट्रान्सफॉर्मर कॉईल, १० हजार रुपये किंमतीचे एमसीबी स्विच आणि २ लाख रुपये किंमतीची एक पीसीबी प्रिंटिंग मशिन असा एकूण ४ लाख ६० हजार रुपयांचा माल चोरला आहे.चोरीच्या घटनेनंतर मालाची माहिती मुख्यालयाकडून मिळण्यास विलंब झाल्यामुळे तक्रार दाखल करण्यास उशीर झाला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.