रितेश देशमुखच्या आगामी ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या सेटवर काल एक मोठी घटना,शूटिंगनंतर पोहायला गेलेल्या एका डान्स आर्टिस्ट नदीपात्रात बुडाला

रितेश देशमुखच्या आगामी ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या सेटवर काल एक मोठी घटना घडली. सिनेमाच्या सेटवर शूटिंगनंतर पोहायला गेलेल्या एका डान्स आर्टिस्ट नदीपात्रात बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला.अजूनही त्याचा शोध सुरु आहे. या घटनेने ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या सेटवर सर्वांनाच चांगला धक्का बसला. ही घटना कशी घडली? याबद्दल रितेश देशमुखच्या ‘मुंबई फिल्म कंपनी’ने त्यांचं अधिकृत स्टेटमेंट जारी केल.

मुंबई फिल्म कंपनीने दिलेल्या स्टेटमेंटमध्ये लिहिण्यात आलंय की, “अत्यंत खेदाने शूटींग दरम्यान घडलेल्या घटनेला आम्ही दुजोरा देत आहोत. संगम माहुली मंदिर, सातारा इथे आमच्या आगामी चित्रपटाचं शूट सुरू असताना ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली. दोन दिवसांचं शूटिंग निर्विघ्न पार पडले होते. दुस-या दिवशीचे पॅकअप झाल्यानंतर, सगळे हॉटेलकडे परतण्याच्या तयारीत असताना काही आर्टीस्ट्स जवळच्या नदीपात्रात पोहण्यासाठी उतरले. ह्यामध्ये आमचा डान्स आर्टिस्ट सौरभ शर्मा हा देखील होता आणि दुर्दैवाने तो नदीपात्रात हरवला.”सदर बातमी समजताच, तातडीने अभिनेता-दिग्दर्शक रितेश देशमुख, निर्मात्या जिनेलिया देशमुख आणि नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा हे संपूर्ण टीमसह तात्काळ नदीकाठी पोहोचले. सौरभ ह्यांना शोधण्यासाठी विनाविलंब स्थानिक पोहणा-यांची मदत घेण्यात आली आणि लगेच चित्रीकरणाच्या ड्रोनचा शोधकार्यसाठी वापर करण्यात आला. श्री देशमुख ह्यांनी साताऱ्याचे जिल्हाधिकारी श्री. पाटील आणि इतर संबंधित यंत्रणांशी संपर्क साधून शोधमोहीम वेगवान करण्याची विनंती केली.””शोधकार्य अजूनही सुरू आहे. आम्ही ह्या शोधकार्यात संपूर्ण सहकार्य करीत आहोत. सौरभच्या कुटुंबीयांशी आम्ही सतत संपर्कात आहोत आणि त्यांना संपूर्ण मदत करित आहोत. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पुढील शूटिंग आम्ही स्थगित केलेले आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button