राहुल गांधी यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे व या घटनेवरून केंद्र सरकारला फटकारले


काँग्रेस खासदार व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ट्विटरवरून या हल्ल्याचा निषेध केला आहे व या घटनेवरून केंद्र सरकारला फटकारले आहे.जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात एका पर्यटकाचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. ही बातमी अत्यंत निंदनीय आणि धक्कादायक आहे. आहे. शोकाकुल कुटुंबांप्रती मी संवेदना व्यक्त करतो आणि जे जखमी झालेयत ते लवकरात लवकर बरे होतील अशी आशा करतो”, असे त्यांनी ट्विट केले आहे.

या ट्विटसोबत त्यांनी केंद्र सरकारलाही फटकारले आहे. ”संपूर्ण देश दहशतवादाविरुद्ध एकजूट आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य असल्याचे पोकळ दावे करण्याऐवजी, केंद्र सरकारने आता जबाबदारी घेत भविष्यात अशा क्रूर घटना घडू नये म्हणून आणि निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागू नये म्हणून ठोस पाऊले उचलायला हवीत’, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button