
मत्स्य विभागाची ’स्टार्टअप ग्रँड चॅलेज’ स्पर्धा, अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ११ मे.
. भारत सरकारच्या मत्स्य व्यवसाय विभागाने स्टार्टअप इंडिया आणि उड्य्ष्ऊ यांच्या सहयोगाने ’फिशरीज स्टार्टअप ग्रँड चॅलेंज २.० ही स्पर्धा ८ मार्च रोजी सुरू केली आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ मे असून इच्छुक मत्स्य स्टार्टअप्सनी या स्पर्धेसाठी अर्ज करण्याचे आवाहन मत्स्य व्यवसाय विभागाकडून आले आहे. एकूण पाच विषयांवर आधारीत या स्पर्धेतील दहा विजेत्यांना प्रत्येकी १० लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील नवउद्योजकांमी त्यांच्या नवकल्पना विकसित कराव्यात आणि नवीन स्टार्टअप्सला चालना द्यावी, हा याउपक्रमाचा उद्देश आहे.
या ग्रँड चॅलेंज २.० अंतर्गत पाच मुख्य विषय दिले असून प्रत्येक विषयासाठी दोन स्टार्टअप्सची निवड केली जाणार आहे. देशभरातील सर्व स्टार्टअप्स आणि संबंधित भागधारकांनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जास्तीतजास्त प्रचार प्रसिद्धी करण्याबाबत केंद्र शासनाने निर्देश -दिले आहेत.www.konkantoday.com