
खेड शहरातील शिवतररोड येथे मारहाणप्रकरणी दोन महिलांसह चौघांवर गुन्हा दाखल..
खेड शहरातील शिवतररोड-रोहिदासनगर येथे घराच्या बांधावर ठेवलेल्या झाडाच्या कुंड्यांना पाणी घातल्याचा राग मनात धरत दोन महिलांसह दोघांनी केलेल्या मारहाणीत दोघे जखमी झाले. याप्रकरणी चौघांवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना मंगळवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सागर सुरेश खेडेकर, सुयोग सुरेश खेडेकर यांच्यासह दोन महिला (रा. शिवतररोड-रोहिदासनगर, खेड) अशी संशयितांची नावे आहेत. प्रथमेश चंद्रकांत गिम्हवणेकर (३४) यांच्यासह एका महिलेचा जखमींमध्ये समावेश असून त्यांच्यावर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.
प्रथमेश गिम्हवणेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयित महिलेने विनाकारण शिवीगाळ करण्यास सुरुवात केली असता फिर्यादीने शिवीगाळ करू नका, असे सांगितले. यानंतर सागर खेडेकर यांने घरातून लोखंडी रॉड आणून कुंड्या तोडून नुकसान केले. तर सुरज खेडेकर यांने फिर्यादीच्या डोक्यात मारुन दुखापत केली. त्याची बहीण सोडवण्यासाठी आली असता तिलाही दुखापत केली. फिर्यादीच्या बहिणीलाही शिवीगाळ दमदाटी करून ठार मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले.www.konkantoday.com