पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली


पहलगाम येथील बैसरन कुरणात पर्यटकांवर गोळीबार करण्यात आला. दहशतवादी गट लष्कर ए तैयबाची शाखा असलेल्या दि रेझिस्टन्स फ्रंटचे हे सदस्य असल्याचं म्हटलं जातंय.पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा फोटो समोर आला आहे दरीच्या सभोवतालच्या घनदाट पाइन जंगलातून कुर्ता पायजमा घातलेले किमान ५ ते ६ दहशतवादी बैरसन कुराणात आले. त्यांनी एके ४७ ने गोळीबार केला. गुप्तचर संस्थांनी या हत्याकांडाचा सूत्रधार सैफुल्लाह कसुरी उर्फ ​​खालिदचीही ओळख पटवली आहे. तो लष्कर-ए-तोयबाचा एक प्रमुख कमांडर होता. जंगलाचा फायदा घेऊन पळून जाणाऱ्या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात दहशतवादविरोधी मोहीम सुरू केली आहे आणि हेलिकॉप्टर तैनात केले आहेत.
भारताची गुप्तचर यंत्रणा देखील अलर्टवर असून ते या दहशतवाद्यांची माहिती गोळा करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून नंबर प्लेट नसलेली एक संशयास्पद दुचाकी जप्त केली आहे. दहशतवादी याच दुचाकीवरून बैसरन येथे आले असावेत असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

दोन दहशतवाद्यांनी एम ४ कार्बाइन असॉल्ट रायफल बाळगल्या होत्या तर इतर दोघांनी एके-४७ रायफल बाळगल्या होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button