
पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानव दर्शन हीरक महोत्सवांतर्गत विचार पुस्तिकेचे विद्यार्थ्यांना वितरण.
रत्नागिरी दि. 23 : जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानव दर्शन हीरक महोत्सवांतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचार पुस्तिकेचे वितरण निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना करण्यात आले.
पंडित दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानव दर्शन हीरक महोत्सव राज्यात दि.२२ एप्रिल ते दि.२५ एप्रिल २०२५ या कालावधित साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे एकात्म मानवदर्शन विचार जिल्ह्यातील युवा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याकरिता जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीमार्फत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचार पुस्तिकेचे वितरण निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या हस्ते उपस्थित विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात करण्यात आले.
या कार्यक्रमाला शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयाचे अधिकारी तसेच सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था व इतर उपस्थित होते.