
रत्नागिरीतील ज्येष्ठ वकील पुरुषोत्तम महाजनी यांचे निधन
रत्नागिरी येथील ज्येष्ठ वकील पुरुषोत्तम ल. महाजनी यांचे मंगळवारी सायंकाळी वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले. महाजनी यांचे मूळ गाव मालवणमधील श्रावण. देवगड, मुंबई, ठाणे येथे त्यांनी शिक्षण पूर्ण केले. जिल्हाधिकारी कार्यालयात सचिव म्हणून त्यांनी काम केले. त्यांनी स्टेनोग्राफर म्हणूनही काही काळ काम केले. १९८१ साली वकिली सुरू केल्यावर ऍड. शिवप्रसाद महाजनी यांनी सुरू केलेल्या महाजनी असोसिएटमध्ये ते भागीदार होते. त्यांनी दिवाणी व विशेष करून लैबरमध्ये प्रॅक्टिस केली. त्यांनी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे उपकार्याध्यक्ष म्हणूनही काम केले. त्यांच्या पश्चात सून, नातवंडे असा परिवार आहे.