
UPSC चा निकाल जाहीर, महाराष्ट्राचा अर्चित डोंगरे देशात तिसरा.
पीएससीचा निकाल जाहीर झाला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने हा निकाल आज (22 एप्रिल) जाहीर केला आहे. या परीक्षेला बसलेले विद्यार्थी यूपीएससीच्या वेबसाईटवर जाऊन निकाल पाहू शकतात.महाराष्ट्रातील अर्चित डोंगरे देशभरातून तिसरा आला असून शक्ती दुबेने देशातून पहिला येण्याचा बहुमान पटकावला आहे.भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय परराष्ट्र सेवा (IFS), भारतीय पोलिस सेवा (IPS) आणि विविध गट ‘अ’ आणि गट ‘ब’ या केंद्रीय सेवांमध्ये नियुक्त्यांसाठी एकूण 1,009 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.