
राष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेसाठी देवरूखच्या रेयांश बनेची निवड.
अखिल भारतीय जलद रोलर स्केटिंग मानांकन स्पर्धा २०२५ दि. १५ ते १९ मे दरम्यान कोचीन केरळ येथे होणार आहे. या राष्ट्रीय मानांकन स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात रेवांश बने याची निवड झाली आहे.रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने व मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा एर्नाकुलम कोची केरळ येथे घेण्यात येणार आहे. यात ६ ते ८, ८ ते १०, १० ते १२, १२ ते १५, १५ ते १८ अशा पाच वयोगटातील मुले-मुली व पुरूष व महिला खुला गट असे विविध गट सहभागी होणार असून यातून अखिल भारतीय मानांकन ठरणार आहे. या अखिल भारतीय जलद स्केटिंग मानांकन स्पर्धेत रेयांश पृथा पराग बने यांची निवड झाली आहे. रेयांश हा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करणारा सर्वात लहान खेळाडू ठरला आहे.www.konkantoday.com