
रत्नागिरी मधील जागृत मोटर्स प्रा.ली मध्ये मनसे कामगार युनियनची स्थापना.
रत्नागिरी मधील मारुती कंपनीचे अधिकृत विक्रेते जागृत मोटर्स प्रा.ली. येथील अनेक कामगारांनी मनसे कामगार सेनेचे सभासदत्व स्वीकारले. त्याचा फलक अनावरण महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना उपाध्यक्ष वैभव शेट्ये यांचे हस्ते कामगार सेना चिटणीस गणेश खंदारे चिटणीस मनोज रामाराजे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश सौन्दळकर उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर कामगार सेना जिल्हा चिटणीस महेंद्र गुळेकर तालुकाध्यक्ष सचिन शिंदे शहर अध्यक्ष बाबय भाटकर शहर सचिव प्रभात सुर्वे यांचे उपस्थितीत झाला त्यानंतर द्वार सभेचे देखील आयोजन करण्यात आले होते.

फालकाचे अनावरण झाल्यावर द्वार सभे मध्ये मार्गदर्शन करताना वैभव शेट्ये यांनी कामगारांना त्यांच्या वर होणाऱ्या अन्याय विरोधात मनसे नक्कीच आवाज उठवणार व न्याय मिळवून देणार असे सांगितले.त्यांनंतर कंपनी मॅनेजमेंट ला भेटण्याकरिता शिष्ट मंडळ गेले असता कामगारांच्या बाजूने अनेक गोष्टी शिष्टमंडळाने तिथे मांडल्या व त्यावरती आगामी काही दिवसात ठोस उपाययोजना न झाल्यास कामगार सेना आणी मॅनेजमेंट यांचा कायदेशीर संघर्ष अटळ असेल असे देखील ठणकावून सांगण्यात आले.या प्रसंगी उपतालुकाध्यक्ष रुपेश चव्हाण वाहतूक सेना तालुका ध्यक्ष खाडे गौरव चव्हाण चैतन्य शेंडे शुभम नागावेकर महिला आघाडी शहर अध्यक्ष सुश्मिता सुर्वे संपदा राणा बिस्मिल्लाह नदाफ काजल गोसावी नंदिनी गोसावी कामगार सोबत मनसे महिला आघाडी व इतर कार्यकारिणी ची उपस्थिती लक्षणीय होती