
यशस्वी मधमाशा पालन उद्योग करणाऱ्या मधपाळांनी 8 मे पर्यंत अर्ज करावेत.
रत्नागिरी, दि. 22 : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई व मध संचालनालय, महाबळेश्वर यांच्यावतीने 20 मे रोजी जागतिक मधमाशी दिनानिमित्त मध उद्योगामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्यांना प्रशस्तीपत्रक, मानचिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील यशस्वी मधमाशा पालन उद्योग करणा-या मधपाळ /प्रगतशील मधपाळ यांनी 8 मे पर्यंत महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जेल रोड, बीएसएनएल ऑफीस शेजारी कुलकर्णी कम्पाउन्ड, रत्नागिरी येथे विहीत नमुन्यात अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी शैलेंद्र कोलथरकर यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी इच्छुकांनी जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा. कार्यालयाचा दूरध्वनी क्र.02352-222379 आहे. तर ई मेल आयडी dvioratnagiri@mskvib.org असा आहे.000