
रानातील मशरूमचे सेवन केल्याने संगमेश्वर तालुक्यातील मुर्शी येथिल नऊ जणांना अन्नातून विषबाधा
संगमेश्वर तालुक्यातील मुर्शी
वाणीवाडीतील ९ जणांना अन्नातून विषबाधा होण्याचा प्रकार रविवारी रात्री घडला.
मुर्शी वाणीवाडीतील भिंगार्डे कुटुंबियांनी रविवारी रात्री जेवताना रानातील मशरूमचे सेवन केले. जेवणानंतर रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास सर्वांना अचानक उलट्या व जुलाब होवू लागले. प्रथम कोंडगाव येथील खासगी दवाखान्यात उपचार करण्यात आले.नंतर ७ जणांवर साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात व २ महिलांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयात हलविण्यात आले
www.konkantoday.com