
दिवाणखवटी रेल्वेस्थानकानजिक ’तुतारी’ एक्प्रेसमधून प्रवास करणार्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून चोरट्याने पळ काढला.
रेल्वेगाड्यातून प्रवास करणार्या महिलांच्या गळ्यातून मंगळसूत्र व सोनसाखळी हिसकावण्याचे चोरट्याचे सत्र सुरूच आहे. तुतारी एक्सप्रेसमधून प्रवास करणार्या एका महिलेच्या गळ्यातील ४१ हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावत पलायन केल्याची घटना २० एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास दिवाणखवटी रेल्वेस्थानकानजीक घडली. चोरट्यावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सृष्टी प्रकाश चव्हाण (२८ पनवेल-रायगड) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्या तुतारी एक्स्प्रेसमधून एस-८ डब्यातील २१ नंबर आसनावरून प्रवास करत होत्या. एक्सप्रेस दिवाणखवटीनजीक क्रॉसिंगसाठी थांबली होती.www.konkantoday.com