
जिजाऊ”तर्फे आयोजित नमन स्पर्धेत मिरजोळे नवतरुण कालिका नाट्य नमन मंडळ गुरववाडीला तृतीय क्रमांक
रत्नागिरी : जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था महाराष्ट्र, रत्नागिरी विभाग यांच्या वतीने १७ एप्रिल ते २१ एप्रिल या कालावधीत भव्य नमन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात झालेल्या या स्पर्धेत रत्नागिरीतील नामांकित आणि मातब्बर असे १० संघ सहभागी झाले होते.

या स्पर्धेत नवतरुण कालिका नाट्य नमन मंडळ मिरजोळे गुरववाडीने या वर्षी प्रथमच नमन कलेचे अप्रतिम सादरीकरण करून स्पर्धेत तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरले. उत्कृष्ट बालकलाकार म्हणून ऋग्वेद भरत गुरव याचा गौरव करण्यात आला. नवतरुण कालिका मंडळाने जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या निकष आणि नियमाचे काटेकोर पालन करून अतिशय सुंदर आणि अप्रतिम असे नमन सादर केले आणि रसिकांची, परीक्षक आणि आयोजकांची मने जिंकली.या नमनाचे निर्माता दशरथ गुरव, संजय गुरव, तुकाराम गुरव हे असून, दिग्दर्शनाची बाजू सागर शिंदे, शिवाजी गुरव यांनी सांभाळली. यामध्ये शाहीर प्रणव गुरव तसेच दिनेश गुरव, महेंद्र गुरव, ओंकार गुरव, ऋषीकेश गुरव, रितेश गुरव, दीपक गुरव, नितीन गुरव, भगवान गुरव, चंद्रशेखर गुरव, बावा गुरव, भगवान गुरव तर मावशीच्या भूमिकेत आदित्य पायरे हे कलाकार सहभागी झाले होते. यासाठी मंगेश गुरव आणि ॲड. विजय गुरव (सोनवडे) यांचे विशेष सहकार्य लाभले. मंडळाच्या कलाकारांनी आणि सहकाऱ्यांनी जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष नीलेश भगवान सांबरे आणि संस्थेचे पदाधिकारी यांच्या हस्ते पारितोषिक स्वीकारले.