
खरीप हंगाम विभागस्तरीय कार्यशाळा बुधवार, गुरुवारी दापोलीत.
रत्नागिरी, दि. २२ – डाॕ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु यांच्या अध्यक्षतेखाली आणि कृषी आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली खरीप हंगाम २०२५ विभागस्तरीय नियोजन व कार्यशाळा उद्या बुधवार दि. २३ व गुरुवार दि. २४ एप्रिल रोजी दापोली कृषी विद्यापीठात होणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी दिली.
बुधवारी २३ एप्रिल रोजी सकाळी ९-३० ते १० नोंदणी, १० ते १०-३० स्वागत, प्रास्तविक आणि विभागाचे सादरीकरण १०-३० ते ११-३० कृषी संचालक, संशोधन संचालक डाॕ पराग हळदणकर, कृषी आयुक्त सुरज मांढरे, कुलगुरु डाॕ संजय भावे यांचे मार्गदर्शन.
११-३० ते २-३० तांत्रिक मार्गदर्शन, दुपारी ३ ते ५-३० खरीप हंगाम मोहिमांच्या अनुषंगाने प्रात्यक्षिक व प्रक्षेत्र भेट गुरुवार दि. २४ एप्रिलरोजी सकाळी १० ते ११ फलोत्पादन संचालक कैलास मोते, आत्मा संचालक अशोक किरनळ्ळी, कृषी प्रक्रिया व नियोजन संचालक विनयकुमार आवटे, निविष्ठा व गुणनियंत्रक संचालक सुनिल बोरकर, विस्तार व प्रशिक्षण संचालक रफिक नायकवडी यांचे मार्गदर्शन होणार आहे. ११ ते १ सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर जिल्हानिहाय सादरीकरण. दुपारी १ ते २ प्रगतिशील शेतकरी/ पुरस्कार प्राप्त शेतकरी, आंबा- काजू उत्पादक संघ शेतकरी चर्चा. दुपारी २-३० ते ४-३० खरीप हंगाम नियोजन व पूर्वतयारीच्या दृष्टीने सांघिक चर्चा. ४-३० ते ५ समारोप.