
काळबादेवीवासियांना हवा समुद्राजवळून महामार्ग, पर्यटनाला चालना मिळण्यासाठी ग्रामस्थांची आग्रहाची मागणी.
रेवस रेड्डी सागरी महामार्ग नियोजनामध्ये रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवी येथे साडेचार कि.मी.चे उड्डाणपूल प्रस्तावित आहे. या उड्डाणपुलाऐवजी समुद्रकिनार्यालगत जमिनीवरचा रस्ता व्हावा, यामुळे गावच्या पर्यटन उद्योगाला मोठी मदत मिळेल असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या मागणीसाठी यापूर्वी ग्रामसभेत ठराव झाला असून आता गमिस्थांचे स्वाक्षरी अभियान हाती घेण्यात आले आहे.
आतापर्यंत चारशेहून अधिक ग्रामस्थांनी स्वाक्षर्या केल्या आहेत, अशी माहिती सरपंच तृप्ती पाटील यांनी दिली.राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी रेवस-रेड्डी सागरी महामार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये मिर्या-काळबादेवी खाडीवील पूल प्रस्तावित आहे. या पुलाला जोडून उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आला आहे. या उड्डाणपूल बसणी साखरतर रस्त्याला जोडण्यासाठी प्रस्तावित आहे. या उड्डाणपुलाऐवजी मिर्या-काळबादेवी पुलाला लागून समुद्रालगत आरे गावापर्यंत रस्ता प्रस्तावित करावा अशी मागणी काळबादेवी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभने २० ऑगस्ट २०२४ रोजी केली आहे.www.konkantoday.com