
शिवसेना ठाकरे गटाच्या रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुखपदी सहदेव बेटकर यांची नियुक्ती.
काही दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केलेल्या सहदेव बेटकर यांना आता ठाकरे सेनेच्या संघटनेत मानाचे स्थान देण्यात आले आहेशिवसेना पक्षप्रमुख उद्धव रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुखपदी सहदेव बेटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकार्यांच्या नियुक्त्या जाहिर करण्यात आल्या आहेत. रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुखपदी सहदेव बेटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुखपदी बाळाराम खेडेकर आणि दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुखपदी दत्ता कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात मुजीब रुमाणे दापोली विधानसभा मतदार संघासाठी विधानसभाप्रमुख खेड तालुकाप्रमुख दत्ताराम भिलारे, खेड शहरप्रमुख चंद्रशेखर पाटणे, जितेंद्र दवंडे यांना मंडणगड तालुका संघटकपदी निवडण्यात आले आहे.दक्षिण रत्नागिरी जिल्हात रविंद्र डोळस जिल्हा समन्वयक व प्रभारी उपजिल्हाप्रमुख, संतोष खेराडे जिल्हा संघटक, अशोक सक्रे विधानसभाप्रमुख, रामचंद्र सरवणकर विधानसभा संघटक, जयेश चव्हाण सहसंपर्कप्रमुख, अनाजी गोठम उपतालुकाप्रमुख यांची निवड करण्यात आली आहे.