
राज ठाकरे यांना मंत्री योगेश कदम यांचा एक आपुलकीचा सल्ला’
दोन्ही ठाकरे बंधु एकत्र आल्यास महाराष्ट्रातील राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो? त्याचे फायदे-तोटे याचं विश्लेषण सुरु झालं. आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नेते आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी X वर एक पोस्ट केली आहे. ‘सन्माननीय राजसाहेबांना एक आपुलकीचा सल्ला. उबाठा गटाच्या प्रमुखांची निती ही ‘वापरा आणि फेकून द्या’ ही राहिलेली आहे. स्वत:चा स्वार्थ साधुन झाला की त्यांना रक्ताची नाती सुद्धा नकोशी होतात आणि याचा प्रत्यय खुद्द सन्माननीय राजसाहेब ठाकरेंना देखील आहे’ असं योगेश कदम यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.