दापोली नगरपंचायत कोट्यवधींच्या आर्थिक अपहारप्रकरणी सावंत यांच्यामागे अनेक साथीदार?चौकशीची मागणी शिंदे गटाच्या शिवसेना शहरप्रमुखाच्या मागणीने खळबळ

रत्नागिरी                                                                                                                      दापोली नगरपंचायतीच्या लेखापाल दीपक सावंत हा ६५ ते ७० कोटी रुपयांच्या आर्थिक अपहार प्रकरणी सध्या कोठडीत आहे. पण या सगळ्यामागे अजुन कोण साथीदार आहेत का याची चौकशी व्हावी अशी सूचक मागणी एकनाथ शिंदे गटाचे दापोली शिवसेना शहर प्रमुख प्रसाद रेळेकर यांनी केली आहे. यासंदर्भात एक प्रसिद्धीपत्रक माध्यमांकडे दिले आहे.                                                                मागील दोन महिन्यांपूर्वी उघड झालेल्या या भ्रष्टाचार प्रकरणाची व्याप्ती फार मोठी असल्याची चर्चा शहरात सर्वत्र चालू आहे. शहर विकासाच्या कोट्यावधी रुपयांची ही अफरातफर आपल्या शहराला किमान दहा वर्षे मागे नेणारी आहे. दापोली नगरपंचायतीने केवळ दिनांक १ एप्रिल २०२१ ते दिनांक ३० मार्च २०२२ या एकाच वर्षाचा अहवाल स्थानिक पोलीस प्रशासनाकडे सादर केला आहे. मात्र, या भ्रष्टाचाराचा मुख्य सूत्रधार म्हणून दीपक सावंत याच्या नोकरीच्या संपूर्ण कालावधीतील व्यवहाराची सखोल चौकशी व्हावी, अशी आमची मागणी आहे. माननीय आमदार योगेशदादा कदम यांच्याकडे या मागणीचे निवेदन आम्ही शहराच्या वतीने याआधीच सादर केलेले आहे. संभावित ६० ते ७० कोटी रुपयांच्या या भ्रष्टाचारामागे सावंत याचे अनेक साथीदार असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाची अत्यंत सखोल चौकशी करून या गुन्ह्याशी संबंधित सर्व घटकांवर या कोट्यवधी रुपयांच्या परतफेडीची जबाबदारी निश्चित करून शहरातील नागरिकांना न्याय मिळवून द्यावा. व आमच्या शहराचा हक्काचा विकासनिधी आम्हाला परत मिळवून द्यावा अशी आमची मागणी आहे. मा. आम, योगेश कदम यांनी आमच्या याही मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करतील याविषयी आम्हाला खात्री आहेच.. या भ्रष्टाचाराचे दूरगामी परिणाम शहर विकासावर दिसून येत आहेत. त्यामुळे शासनाने विशेष समिती गठीत करून दापोली नगरपंचायतीचे सखोल ऑडिट करून भ्रष्टाचाराचा नेमका आकडा निश्चित करावा व सदर रक्कम वसुलीची जबाबदारी देखील निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात सखोल चौकशी करावी अशी मागणी मा. आमदार योगेश कदम यांच्याकडे केलेली आहे.

शहर विकासासाठी आजपर्यंतचा सर्वाधिक निधी  आमदार योगेश कदम यांच्या माध्यमातून नगरपंचायत आणि संबंधित खात्यांना प्राप्त झाला आहे. या निधीचा झालेला अपहार हा शहरातील नागरिकांसह इथल्या व्यापारी, दुकानदार, लघु उद्योजकांची घोर निराशा करणारा आहे  किंबहुना, या सर्वांच्या मेहनतीचा अपमान करणारा असल्याचीच ठाम भावना आम्हां सर्वांचीच झाली आहे. यास्तव या भ्रष्टाचार प्रकरणातील सहभागी प्रत्येक घटकाला कोणत्याही परिस्थितीत सहानुभूती दाखवली जाणार नाही, असे अभिवचन मा. आमदार योगेश कदम यांनी दिले आहे अशी माहिती या प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे. तरी सदरील प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री  एकनाथ  शिंदे यांनी तातडीने लक्ष घालून शहरवासीयांना न्याय मिळवून द्यावा. अशीही मागणी आम्ही मा. आमदार योगेश कदम यांच्याकडे केलेली आहे. प्रसाद प्र. रेळेकर एकनाथ शिंदे गटाचे दापोली शिवसेना शहर प्रमुख यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button