टँकर अडकल्याने तिलारी घाटातील वाहतूक पाच तास ठप्प

तिलारी घाट उतरताना एका तीव वळणावर एक सिमेंट वाहतूक करणारा टँकर रविवारी सकाळी अडकला. यामुळे या अरूंद घाटातील संपूर्ण रस्ता अडवला गेला यामुळे सुमारे पाच तासांहून अधिक काळ या घाटातील वाहतूक ठप्प झाली.रविवारी सकाळी गोव्याला सिमेंट वाहतूक करणारा एक कंटेनर तिलारी घाट उतरत होता. मात्र घाटातील तीव्र उतार व यू आकाराच्या वळणाचा चालकास अंदाज चुकला आणि कंटेनर संरक्षक कठड्याला अडकला. सुदैवानेच कंटनेर खोल दरीत कोसळण्यापासून वाचला. यावेळी चालकाने टँकर मागे घेण्याचा प्रयत्न केला. मात्र चालक अपयशी ठरला. यात कंटेनर रस्त्यावरच आडवा राहिल्याने रस्ता वाहतुकीस बंद झाला. यामुळे एसटीसह इतर वाहने दुतर्फा अडकून पडली. तब्बल पाच तासांहून अधिक वेळ वाहतूक खोळंबली. यावेळी घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अशा अवजड वाहनांना तिलारी घाटातून वाहतुकीस बंदी घालावी अशी मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button