
सोन्याने तोडले सर्व रेकॉर्ड, १ लाख पार
सोन्याच्या दरात तेजी कायम आहे. किरकोळ बाजारात सोन्याने १ लाख रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. आता मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा दर मंगळवारी प्रति १० ग्रॅम ९९,१७८ रुपयांच्या नव्या उच्चांकावर पोहोचला.हा दर मागील सत्रातील दरापेक्षा जवळपास १,९०० रुपयांनी अधिक आहे.सोमवारी जीएसटी वगळता, सराफा बाजारात सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९७,२०० रुपयांवर होता. तर ३ टक्के जीएसटीसह हा दर किरकोळ बाजारात सोन्याच्या दराने १ लाख रुपयांचा टप्पा पार केला.
दरम्यान, आज एमसीएक्सवर सोन्याचा दर ०.३३ टक्के वाढून प्रति किलो ९५,५६२ रुपयांवर खुला झाला.दिल्लीत २४ कॅरेट म्हणजे शुद्ध सोन्याचा दर १,६५० रुपयांनी वाढून प्रति १० ग्रॅम ९९,८०० रुपयांवर पोहोचला आहे. किरकोळ बाजारात सोने खरेदी करताना जीएसटीसह घडणावळ खर्च आकारला जातो. यामुळे प्रति तोळा सोन्याचा दर १ लाख रुपयांवर गेला आहे.मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख १ हजारांवर पोहोचला आहे. चेन्नई आणि बंगळूरमध्येही सोने १ लाख पार झाले आहे.