
खेड शहरात नारळ खरेदीसाठी गेलेल्या महिलेचे ४ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास.
खेड शहरातील वाणीपेठ येथील एका नारळाच्या दुकानात नारळ खरेदी करत असताना बाजूला ठेवलेल्या पर्समधील अंदाजे ४ लाख रुपये किंमतीच्या सोन्याच्या दागिन्यांवर दोन महिलांनी डल्ला मारल्याची घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली. दागिने असलेली पर्स चोरीला गेल्याचे निदर्शनास येताच धक्का बसलेल्या विवाहितेने पोलीस ठाणे गाठत घडलेला प्रकार कथन केला. पोलिसांनीही सीसीटीव्ही फुटेज तपासले असता काहीच धागेदोरे हाती लागले नसल्याचे समजते.मुरडे येथील सायली संदीप बंडबे या बोरघर येथे माहेरी एका विवाह सोहळ्यास जाण्यासाठी येथील बाजारपेठेत साहित्य खरेदीसाठी आल्या होत्या.www.konkantoday.com