
वार्याचा वेग मंदावल्याने पाच दिवसानंतर मच्छीमारी बोटी समुद्रात.
उत्तरेकडून गेले काही दिवस वेगवान वारे वाहत होते. यामुळे मासेमारी करणार्या नौका सुरक्षिततेसाठी आंजर्ले खाडी व हर्णे बंदरात नांगरून ठेवण्यात आल्या होत्या. परंतु आता वार्याचा वेग मंदावला असल्याने बोटी मच्छीमारीसाठी पुन्हा बोटी समुद्रात गेल्या आहेत.३१ मे पर्यंत मासेमारीचा कालावधी असतो. त्यामुळे आता दीड महिना मासेमारीसाठी शिल्लक राहिला आहे. आधीच नैसर्गिक आपत्तीमुळे मच्छीमारीला ब्रेक लागला आहे. शिवाय एलईडी नौकांचा त्रास सुरू असतो. यामुळे स्थानिक मच्छीमार त्रस्त आहे.
त्यात मासेमारीला दोन महिने असतानाच पुन्हा उत्तरेकडील वेगवान वार्यांमुळे बोटी किनार्यावर आणाव्या लागल्या होत्या. अशा -आपत्तींमुळे स्थानिक मच्छीमार नुकसानीत जात असल्याचे समोर आले आहे.त्यातच एलईडी बोटधारक तळागाळातील मासे घेऊन जात असल्यामुळे पारंपरिक मच्छीमारांना चांगल्या दर्जाचे मासे मिळत नाहीत. शासनाने स्थानिक मच्छीमारांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.www.konkantoday.com