
आबलोली येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत विशेष ग्रामसभा उत्साहात
गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आबलोली या ग्रामपंचायतची विशेष ग्रामसभा सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच उत्साहात झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी किरण लोहार, जि. प.चे शिक्षण विस्तार अधिकारी नरेंद्र गावंड, आबलोली बिटचे शिक्षण विस्तार अधिकारी अविनाश शेंबेकर, तंटामुक्ती अध्यक्ष आप्पा कदम, उपसरपंच अक्षय पागडे, नोडल अधिकारी राजदत्त कदम, बचत गटाच्या सीआरपी सौ. मीनल कदम, सौ. वेदिका पालशेतकर, सौ. उज्वला पवार, मधुकर पागडे, कृष्णा पागडे, ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत सदस्य सौ. वृषाली वैद्य, सौ. शैला पालशेतकर, सौ. पायल गोणबरे, सौ. रूपाली कदम, श्रीमती नम्रता निमुणकर, नित्यानंद कुळये, गोपीनाथ शिर्के यांच्यासह सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक आणि ग्रामपंचायत सदस्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी मुख्यमंत्री पंचायतराज अभियानाचे संभाजीनगर येथून होणारे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी मौलिक मार्गदर्शन करून महत्त्वाच्या सूचना दिल्या.




