
पोलीस असल्याचे भासवून ३ लाखाचे दागिने लुटले.
पोलीस असल्याचे बतावणी करून भरदिवसा दोन ज्येष्ठ नागरिकांना तब्बल ३ लाख १० हजारांचे दागिने लुटल्याची घटना गुरुवारी ४.३० ते ४.५० वाजण्याच्या सुमारास शहरातील शिवनदी पूल परिसरासह खेर्डी येथे घडली. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात दोन अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक पोपटराव साठे व मोहन विष्णू चोचे (चिपळूण) अशी या प्रकरणातील दोघांची नावे आहेत.याबाबतची फिर्याद अशोक पोपटराव साठे (६४) यांनी दिली.
काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी ’आम्ही पोलीस आहोत, तुमच्याकडील दागिने सुरक्षित ठेवा, शहरात चोरटे फिरत आहेत’, अशी बतावणी करत शहरातील मुख्य बाजारपेठेतील शिवनदी पूल ठिकाणी असलेल्या अशोक साठे यांच्यासह मोहन विष्णू चोचे या दोघांचे ३ लाख १० किंमतीचे दागिने काढून ते एका पांढर्या कागदाच्या पुडीमध्ये ठेवण्यास सांगून हातचलाखीने लांबवले. यानंतर ती कागदी पुडी चोचे व साठे यांनी उघडून पाहिली असता त्यामध्ये दगड असल्याचा प्रकार पुढे आला. याप्रकरणी त्या दोन अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.www.konkantoday.com