
जिल्हास्तरीय संरक्षण समितीची बैठक मंगळवारी
रत्नागिरी, दि. 19 : माजी सैनिकांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्यासाठी जिल्हास्तरीय संरक्षण समितीची मासिक बैठक पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दि. 22 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वा. पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी कळविले आहे.
तरी ज्या माजी सैनिकांना कौटुंबिक संदर्भात तक्रारी असल्यास नमूद बैठकीस आपला अर्ज व संबंधित कागदपत्रासह विहित वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात येत आहे. 000