
कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाचा मासिक स्नेह मेळावा 29 जून रोजी
रत्नागिरी (प्रतिनिधी) : कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाचा मासिक मेळावा शनिवार दिनांक २९ जून २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता ज्येष्ठ नागरिक भवनात संपन्न होणार आहे. यावेळी माहे जून महात वाढदिवस असलेल्या ज्येष्ठांचे सत्कार केले जाणार आहेत. तसेच रत्नागिरी जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे अधिकारी पावसाळ्यातील डेंग्यू मलेरिया इत्यादी जलजन्य आजार आणि प्रतिबंधक उपाय योजना याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. श्री मधुसूदन कुलकर्णी हे ऊर्जा बचतीसाठी केंद्र शासनाच्या अनुदानातून मिळणाऱ्या सौर ऊर्जा युनिट संदर्भात माहिती देतील. तरी सत्कारमूर्तींसह सर्व ज्येष्ठ नागरिकांनी या स्नेह मेळाव्याला बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संघाचे अध्यक्ष श्री. मारुती अंबरे यांनी केले आहे.