
ओडिसामधील मादी कासव गुहागर समुद्रकिनारी !
भारताच्या पूर्व किनारपट्टीला असलेल्या ओडीसातील गहीरमठ सागरी किनारपट्टीवरून फ्लिपर टॅग केलेले ऑलिव्ह रिडले कासव तब्बल ३,५०० किलोमीटरचा टप्पा पार करत गुहागर किनारपट्टीवर आले आहे. २५ डिसेंबर २०२४ रोजी गुहागरमधील कासव संवर्धन मित्रांनी ही बाब कांदळवन विभागाच्या निदर्शनास आणून दिल्यावर या सर्व प्रवासाचा उलगडा झाला. यामुळे जिल्हयातील समुद्र किनारपट्टीवर येणार्या या कासवांच्या प्रवासाबाबतची अधिक माहिती मिळवण्यासाठी ३१ जानेवारी रोजी जिल्हयातून ६२ कासवांना फ्लिपर टॅगिंग करुन समुद्रामध्ये सोडण्यात आले असून यामध्ये गुहागरातील ५९ मादी कासवांचा समावेश आहे.
भारताच्या पूर्व किनारपट्टीला असलेल्या ओडीसामधील गहीरमठ सागरी किनारपट्टीवर लाखो ऑलिव्ह रिडले कासवे अंडी घालण्यासाठी हजेरी लावतात. येथे एका मोसमामध्ये दीड कोटीचा आकडा पार केला आहे. गुहागर किनारपट्टीवर आलेल्या या कासवाबाबतची अधिक माहिती देताना कांदवळवन अधिकारी. www.konkantoday.com