
चिपळूण-पालीमध्ये नदीत बुडून तरुणाचा मृत्यू.
चिपळूण पाली येथील नदीच्या परटवणे डोहात बुडून तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी २ वा. घडली. याची येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली आहे. विजय बळवंत महाडिक (४८, पाली-मधलीवाडी) असे या तरुणाचे नाव आहे. महाडिक हे बुधवारी दुपारी गावातील नदीत पोहण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना गावातील प्रकाश शिवाजी महाडिक यांनी पाहिले होते. मात्र बर्याच वेळानेही ते बाहेर न आल्याने त्यांनी त्यांना आवाज दिला. मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद न आल्याने प्रकाश महाडिक यांनी याची माहिती अन्य ग्रामस्थांना दिली.
त्यानुसार त्यांची शोधाशोध सुरू केली असता सायंकाळी मृतदेह सापडला. विजय महाडिक हे उत्कृष्ट कलाकार होते. सामाजिक कार्यात त्यांचा पुढाकार असे. अनेक वर्षे ते पुण्यात नोकरीला होते. गेले काही महिने ते गावात आले होते. असे असताना त्यांचा आकस्मिक मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ, बहीण, चुलते असा परिवार आहे.www.konkantoday.com