
खेड नगर परिषद अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ नाही.
खेड नगर परिषदेचा २०२५-२६ या आर्थिक वर्षातील कोणतीही करवाढ नसलेला व ९५ कोटी ६३ लाख ३ हजार ९४५ रुपयांच्या अर्थसंकल्पास प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या अंदाजपत्रकात ९५ कोटी २८ लाख १३ हजार ७७० रुपयांची खर्चासाठी तरतूद करण्यात आली आहे. प्रशासक तथा प्रांताधिकारी शिवाजी जगताप, मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत यावर्षीचा अंदाजपत्रकीय अर्थसंकल्प मांडण्यात आला. यावर्षीच्या अर्थसंकल्पात नागरिकांवर कोणत्याही प्रकारचा वाढीव कराचा बोजा लादण्यात आलेला नाही. १४ कोटी ५५ लाख ९० हजार ७२४ रुपये इतकी आरंभीची शिल्लक असून ८१ कोटी ७ लाख १३ हजार २२१ रु. कराच्या माध्यमातून जमा झाले आहेत.
२०२५-२६ या आर्थिक वर्षात सामान्य प्रशासन विभाग, निवृत्तीवेतन विभाग, करवसुली विभागासाठी ३ कोटी ३३ लाख १३ हजार रूच्या खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. अग्निशमन व दिवाबत्ती विभागावर ७६ लाख ३६ हजार ९९६ रु. खर्च केले जाणार आहेत. पाणी पुरवठा विभागासाठी ३ कोटी ८८ लाख ८५ हजार रु.च्या खर्चाची भरीव तरतूद करण्यात आली आहे. स्वच्छता विभागासाठी २ कोटी ९३ लाख २१ हजार रु.चा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. दवाखाना विभागावर ४७ लाख २ हजार रु. तर सार्वजनिक उद्यानासाठी १३ लाख ६५ हजार ५०० रु.ची तरतूद करण्यात आली आहे. बांधकाम विभागासाठी २ कोटी ९२ लाख ५० हजार रु. तर भांडवली खर्चासाठी ६ कोटी ९८ लाख २७ हजारांची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात का आलीwww.konkantoday.com