
सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्यात पाण्याचा बकेटमध्ये बुडून दोन वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्यात खाकशी तिठा येथे विजापुरी कामगाराची दोन वर्षीय मुलगी खेळत असताना पाण्याचा बकेटमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना घडलीयाबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मूळचे विजापूर येथील सचिन जाधव यांचे कुटूंब खाकशी तिठा येथे वास्तवास आहे ते झोपडीमध्ये राहत असून त्यांची दोन वर्षाची मुलगी पवित्रा ही बुधवारी दुपारी २.३० वा.सुमारास खेळत होती. यावेळी झोपडीच्या बाहेर पाण्याने भरून ठेवलेल्या प्लॅस्टिकच्या बकेटमध्ये खेळत असताना ती त्यामध्ये पडली. यावेळी खाली डोके वर पाय अशी तिची स्थिती झाली. हा प्रकार पालकांच्या लक्षात आल्यानंतर तिला बकेटमधून बाहेर काढण्यात आले मात्र तीची काहीही हालचाल होत नसल्याने तात्काळ तिला ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे उपचारापुर्वीच डॉक्टरांनी ती मयत झाल्याचे सांगीतले. याबाबत मुलीची आई सौ.कविता सचिन जाधव यांनी देवगड पोलिस स्थानकात खबर दिली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली