
रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे समुद्रकिनाऱ्यावर मानवी सांगाडा सापडल्याने खळबळ.
रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे समुद्रकिनाऱ्यावर मानवी सांगाडा सापडल्याने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. पुढील तपासणीसाठी हा मृतदेह पाठविला आहे.१६ एप्रिलला रात्रीच्यावेळी रनपार परिसरातील काहीजण मासेमारीसाठी गेले होते. गणेशगुळे ते रनपारदरम्यानच्या समुद्रकिनारी मासेमारीसाठी गरवत असताना त्यांना एक मानवी सांगाडा सापडला.
गुरुवारी (ता. १७) सकाळी आठच्या दरम्यान गणेशगुळे पोलिसपाटील संतोष लाड यांच्याशी मच्छीमारांनी संपर्क साधून याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसपाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून पूर्णगड सागरी पोलिस ठाण्यात खबर दिली. पोलिस अंमलदारांनी घटनास्थळी जाऊन सकाळी दहा-साडेदहाच्या दरम्यान मानवी सापळा पुढील तपासणीसाठी रत्नागिरी येथे पाठवला