
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव शशांक बावस्कर दोन दिवस जिल्हा दौऱ्यावर
रत्नागिरी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव आणि रत्नागिरी जिल्हा निरीक्षक शशांक बावस्कर हे १९ आणि २० एप्रिल रोजी रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान श्री. बावस्कर हे जिल्हाभरात तालुकानिहाय आढावा बैठका घेणार असून, संघटना बांधणीसाठी आणि पक्ष बळकटीसाठी त्यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
उद्या (१९ एप्रिल) रोजी १०.३० वाजता राजापूर, १२ वाजता लांजा, २वाजता संगमेश्वर, ३ वाजता रत्नागिरी ग्रामीण, सायंकाळी ४ वाजता रत्नागिरी शहर अशा बैठका होणार असून, या दोन्ही बैठका संगमेश्वर व रत्नागिरीच्या काँग्रेस भवन येथे होतील. रविवारी (२० एप्रिल) सकाळी १०.३० वाजता मंडणगड, ११ वाजता दापोली या तालुक्यांची बैठक काँग्रेस कार्यालय दापोली येथे होईल. दुपारी १ वाजता खेड, तर ३ वाजता चिपळूण व गुहागर या तालुक्यांची बैठक काँग्रेस कार्यालय चिपळूण येथे होईल.