महाराष्ट्र नवनिर्माण सेना रत्नागिरी कडून हिंदी भाषा सक्ती च्या आदेशाची होळी.

केंद्र शासनाच्या शिक्षणात हिंदी भाषा अनिवार्य यां आदेशाला राज ठाकरेंनी विरोध दर्शवीला होता. त्याचे पडसाद सगळ्यात पहिला आज रत्नागिरी उमटले. राज ठाकरेंच्या आदेशाची तंतोतंत पालन करिता जिल्हाध्यक्ष सौन्दळकरांच्या नेतृत्वाखाली आदेशाच्या प्रतीची होळी करून निषेध नोंदविण्यात आला. हिंदी भाषा शिकवीण्याकरिता सुमारे एक लाख शिक्षकांची गरज लागेल. तिथे ही हे परप्रांतीय आमच्या उरावर येऊन बसणार. आमच्या मराठी मुलांच्या शिक्षकांच्या नोकऱ्या खाणार. कशाला हवे आहे हे सगळे? प्रादेशिक भाषा व प्रादेशिक अस्मिता यांचा मान सन्मान राखला गेलाच पाहिजे.

मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला असताना शालेय विद्यार्थी ना हिंदी भाषा शिकण्या साठी सरकार जबरदस्ती का करत आहे. हे महाराष्ट्र आहे इथे मराठीच चालणार असे देखील ठणकावून सांगण्यात आले.

जबरदस्ती कराल तर याही पेक्षा जहाल आंदोलन बघायला मिळेल असा इशारा देत जिल्हाध्यक्ष सौन्दळकर उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर जिल्हा सचिव महेंद्र गुळेकर नवनियुक्त तालुकाध्यक्ष सचिन शिंदे उपतालुकाध्यक्ष रुपेश चव्हाण शहर अध्यक्ष बाबय भाटकर शहर सचिव प्रभात सुर्वे गौरव चव्हाण महिला शहर अध्यक्ष सुश्मिता सुर्वे शहर सचिव संपदा राणा शहर संघटक बिस्मिल्लाह नदाफ शैलेश मुकदम अखिल शाहू रुपाली गोसावी काजल गोसावी गीता गोसावी नंदिनी गोसावी इत्यादीनी या आदेशा विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button